spot_img
spot_img

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या खोके सरकार विरोधात, आष्टीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, तहसीलदार यांना दिले निवेदन

आष्टी(प्रतिनिधी) सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरूणांचा रोजगार कमी होत आहेत. सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला जात आहे. यामुळे मराठी तरूण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. आशा निर्णयाने हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे. त्या विरोधात आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि ७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करून महायुती सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सदरील उद्योग गुजरातला हलवण्यात येवू नयेत व मराठी तरूणांना न्याय मिळावा अशा घोषणा बाजीकरून व युवकांनी फलक दाखवून तहसील कार्यालयातील परिसर दणाणून सोडला व राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड रिजवान शेख,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ नदीम शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल काकडे, अतुल शिंदे,भरत घोडके, शौकत पठाण,अविनाश तळेकर, भैरव चव्हाण,जिशान सय्यद,शरद आमटे,अरबाज कुरेशी,दत्तु कांबळे,लहू केरूकर,आजिम खान, सचिन पवार,मुजामिल शेख, अरबाज बेग, महम्मद शेख,लहू भवर,अतिक कुरेशी,राजु खेडकर, अस्लम मौगल,माऊली पठाडे,मुदसर सय्यद आदी सहभागी झाले होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!