आष्टी(प्रतिनिधी) गेल्या दोन महिन्यापासून मी मतदार संघातील प्रत्येक गाव, वाड्यावर फिरत आहे. लोकांच्या समस्या जाणून घेत आहे तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने लोकांशी संवाद साधत आहे. प्रत्येक गावातील जनता मला निवडणुकीच्या रिंगणात उतराच असा आग्रह करीत आहेत त्यामुळे लोक आग्रहास्तव मी येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे असे सुतोवाच माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने केले.
नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून सुरू केलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. ३ ऑक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील मांडवा, केरूळ, देविनिमगाव, गितेवाडी, लिंबोडी, खिळद, पाटण, सांगवी, कोहीणी, किन्ही, बेलगाव,शिदेवाडी, कासारी या गावांचा दौरा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १० ऑगस्ट पासून सुरू केलेल्या जनसंपर्क अभियान दौऱ्यात माजी आ. भीमराव धोंडे यांना प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत, साहेब तुमच्या काळात भरपूर विकास कामे झाली. इतर लोकप्रतिनिधींच्या काळामध्ये पाहिजे तेवढा विकास झाला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा तुम्हीच उमेदवार रहा असा आग्रह करीत आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, लोकांनी केलेल्या आग्रहामुळे निवडणूकच्या रिंगणात उतरणार आहे परंतु पक्ष कोणता व चिन्ह कोणते हे आज सांगता येणार नाही. लोकांच्या आग्रहामुळे मी निवडणुकीत उतरणार हे निश्चित आहे.
मी विधानसभा सदस्य असताना रुरबन योजनेत २० गावाचा समावेश केला होता यामध्ये देविनिमगांवचाही समावेश होता त्यामाध्यमातून गावात अनेक विकासकामे झाली आहेत.
माझ्या काळात जी विकास कामे झाली
तशी कामे इतरांच्या काळात झाली नाहीत. सध्या प्रत्येक कामात टक्केवारी घेतली जाते. या टक्केवारीच्या जाचातून सुटायचे असेल तर येत्या निवडणुकीत मला सहकार्य करा. या भागाचा दुष्काळ मला कायमचा संपवायचा आहे. जून पासुन मतदारसंघात पाच आय. टी. आय. सुरु करणार आहे असेही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. कोहीनी येथील सतिष कैलास भवर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी, देविनिमगांव येथील अक्षय बाळासाहेब अनारसे यांची विक्री कर निरीक्षक पदावर निवड झाली, तसेच लिंबोडीच्या उपसरपंचपदी साईनाथ आंधळे यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते तिघांचा सत्कार करण्यात आला. लिंबोडी येथील अश्रुबा आंधळे यांचे चिरंजीव संदीप यांचे अपघातात निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांचे भिमराव धोंडे यांनी निवासस्थानी जाऊन सांत्वन केले.
केरूळ येथे जगदंबा देवीच्या घटस्थापनाच्या निमित्ताने देवीची पालखी टेंभीकडे जाताना पालखीला खांदा देऊन ढोल वाजवत माजी आमदार भिमराव धोंडे यांनी पालखीचे स्वागत केले, तसेच खिळद येथे येडेश्वरी देवीच्या घटस्थापनाच्या निमित्ताने दर्शन घेतले. घटस्थापना निमित्ताने देवी पर्वाला खुप महत्व आहे असेही त्यांनी सांगितले.
देविनिमगांव येथे मिरावली बाबांचे दर्शन घेतले तर ठिकठिकाणी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे व इतर कार्यकर्ते सोबत होते. किन्ही येथे बोलताना सुभाष काकडे यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोठे आहे. २० वर्षात त्यांनी मतदारसंघाचा चांगला विकास केला आहे. सरपंच दादासाहेब जगताप यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे. शैक्षणिक बाबतीतही मोठी प्रगती केली आहे. उर्वरित विकासासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा. रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी सांगितले की, भिमराव धोंडे आमदार असताना मला संजय गांधी कमिटीवर घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो निराधारांना मानधन सुरू केले. त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. तालुक्याचा विकास करणे हेच त्यांचे ध्येय आहे. ठिकठिकाणी जमशेद भाई, बाबुराव पाटील सुर्यवंशी, एकनाथ काकडे, प्रा.भाऊसाहेब ढोबळे, माजी सरपंच आबासाहेब पोकळे, ज्ञानेश्वर गिते, गणेश गिते, ग्रा.पं. सदस्य सुरेश वनवे, बाबासाहेब वनवे, ग्रा.पं. सदस्य शहादेव गर्जे, उद्धव गर्जे व इतरांची भाषणे झाली. वेगवेगळ्या गावात झालेल्या काॅर्नर सभेस चेअरमन दत्तु पवने,
माजी पं. स. सदस्य मधुकर अनारसे,
माजी उपसरपंच गंगाधर श्रीखंडे,संजय केदारी, पोपट मुटकूळे, माजी सरपंच बबनराव काकडे, विष्णू महाराज वनवे, माजी सरपंच अशोक राऊत, कैलास श्रीखंडे, पंढरीनाथ मुटकुळे,सोपान मुटकुळे,बाबासाहेब आंधळे,खेंगरे, एकनाथ काकडे, भरत भवर,
मुरलीधर मडके, अतुल गावडे, अमोल चाटे, बंकटसिंग परदेशी, विठ्ठल हातवटे, अर्जुन जवणे, दादासाहेब पाचे, राजु भाई पठाण, मोहनराव सातपुते, प्रभाकर काकडे, सागर अनारसे, भोनानाथ दहिफळे, चंदनशिव साळवे, जब्बार भाई शेख, झगडे मामा, विठ्ठल फाळके, नानासाहेब ढवळे, डॉ. नितीन पाचे, आसाराम अनारसे, दिलीपराव पोकळे, सरपंच दत्तात्रय खोटे, ग्रा.पं. सदस्य बिभिषण भवर, राम झगडे, बाबासाहेब ढवळे, युवराज साळवे, पॅंथर साळवे, अशोक गिते, खैरे मुकादम, रघुनाथ पाखरे, दिनकर आंधळे, आजिनाथ आंधळे, परमेश्वर आंधळे ,सतीश आंधळे, कृमादास आंधळे, मारुती मरकड, बिभिषण गवारे, रामदास खिलारे, ज्ञानेश्वर पोकळे,रामराव जगताप, प्रविण खंडागळे, सरपंच भाऊसाहेब कोकरे, माजी सरपंच दत्तोबा शिंदे, मुरलीधर विधाते, ज्ञानदेव गिते, कर्डीले, सोनाजीराव पोकळे, बबनराव सिरसाठ, कैलास गिते, भगवान गिते, पो. पाटील अशोक केरूळकर, कुंडलिक मिसाळ,मधुकर वनवे, सुरेश जगताप, रोहिदास भगत, आडकर देवा,आसाराम खिलारे, शिवाजी खिलारे, श्रीमंत गवारे, अज्जू भाई, पांडुरंग खंडागळे, विश्वनाथ भवर, गुलाबराव भवर, भरत महाराज,संतोष बन, रंगनाथ बन, बबन बन, सूर्यभान धुमाळ, शिवाजी बन,दिलीपराव पोकळे, रघुनाथ पाखरे, गणेश पोकळे, अजिनाथ पोकळे, बाळु पिंपळे, पोपट खंडागळे, संभाजी खंडागळे, युनुस शेख, अप्पासाहेब पोकळे,उमेश बन, संतोष बन व इतर उपस्थित होते.