spot_img
spot_img

मोठ्या प्रमाणात विकास कामे आणल्यामुळे विरोधकांकडून आडवा आडवीचे राजकारण, विकास कामात आडवे येणाऱ्यांना जनता माफ करणार नाही – आ. बाळासाहेब आजबे

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात आजपर्यंत कधी नव्हे एवढा विकास निधी आपण या पाच वर्षांमध्ये खेचूनआणला आहे मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असल्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे, ही विकास कामे विरोधकांना देखवत नसल्यामुळे त्यांनी आडवा आडवीचे राजकारण सुरू केले आहे अनेक विकास कामांमध्ये विरोधकाकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत तर अनेक कामांचे बिले रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आ. बाळासाहेब आजबे यांनी गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलताना केला.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सुरू असून बुधवार दिनांक 2ऑक्टोबर रोजी धिरडी चौभा निमगाव केळसांगवी पिंपरी आष्टी या गावामध्ये जाऊन पाच वर्षात केलेल्या विकास कामांचे लोकार्पण व मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केले. यावेळी जेष्ठ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित अण्णा पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती या गाव भेट दौऱ्याला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांमध्ये त्यांची डीजे, ढोल ताशांच्या गजरात बैलगाडी मधून स्वागत केले जात आहे.चोभा निमगाव, केळसांगवी इतर गावांमध्ये बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिले आहे गेल्या 20 वर्षांमध्ये माजी आमदारांनी जेवढा निधी आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी आपण पाच वर्षांमध्ये मतदारसंघात आणला आहे त्यामुळे प्रत्येक गाव ,वाडी ,वस्ती या ठिकाणी विकास कामे करण्यात आली आहेत , एक आमदार पाच वर्षात काय विकास करू शकतो हे आपण जनतेला या पाच वर्षांमध्ये दाखवून दिले आहे ,वक्कल गायब करण्याची पद्धत आपण बंद केल्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने विकास कामे दिसत आहेत दर्जेदार निपक्षपाती पणे काम करण्याला आपण महत्व दिले त्यामुळे मतदारसंघात आज जिथे जाल तिथे विकास कामे दिसत आहेत याचाच पोटशूळ विरोधी लोकांना उठला आहे. आमच्या विकास कामावर टीका केली जात आहे मंजूर करून आणलेली कामेही मंजूर नाहीत असे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे , आता काहीच करता येईना म्हणून आम्ही केलेल्या विकास कामाचे बिले अडवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, आम्ही गेल्या पाच वर्षात निवडणूक संपल्यानंतर कधीही कोण कोणत्या पक्षाचा आहे कोण विरोधक आहे आपले तुपले कधी केले नाही परंतु काही लोकांना चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय असल्यामुळे लोकांनी त्यांना गेले दहा वर्षापासून दूर ठेवले आहे. विरोधक आपल्याकडे काही काम घेऊन आले तरी आपण कधीही दुजा भाव केला नाही त्याचीच पावती म्हणूनआज गावोगाव आपले मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आपण येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमासाठी महेश आजबे,यश आजबे भाऊसाहेब घुले डॉक्टर सुनील गाडे बबन काळे सरपंच वैजनाथ गाडे गणेश पडोळे सरपंच सुरेश तात्या अस्वर डॉक्टर बंडू करडूळे यदु कर डुळे बबन पडोळे महादेव पडोळे ज्ञानदेव कोंडे बापू डांगरे पंडित पोकळे संदीप पवार अशोक सरोदे कामराज कारंजकर नितीन राजगुरू माऊली आस्वर हरिचंद्र खिळे युवराज खिळे वैजनाथ वाळूजकर बबन आवटे संजय आवटे ताराचंद कानडे बाबासाहेब घोरपडे संजय रेपाटे संदीप गिरी आजिनाथ काशीद
रूपचंद आजबे उद्धव पडोळे आप्पासाहेब पडोळे गणेश शेळके संतोष पवार भैरू पडोळे ज्ञानदेव पवार अशोक पडोळे लतीफ बोराडे अंकुश बोराडे तुकाराम पडोळे अण्णासाहेब पडोळे मच्छिंद्र काळे बबन महाडिक जगन्नाथ काळे वैजनाथ वाळुंजकर जगदीश आवटे संतोष करडूळे आजिनाथ करडूळे
गहीनाथ करडूळे नारायण भिताडे बिबीशन करडूळे दादासाहेब करडूळे आजिनाथ करडूळे अर्जुन जाधव उत्तम मोरे शशिकांत बर्डे भरत डिसले वामन करडूळे राम करडूळे केशव करडूळे आनंदा साप्ते कोंडीराम रोकले दीपक करडूळे दिलीप परकाळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!