spot_img
spot_img

यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार; दाते पंचांग अभ्यासक राहुल देवा यांची माहिती, कधी होणार घटस्थापना?

आष्टी (प्रतिनिधी): यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे असून गुरुवारी (ता. ३) सुरू होत आहे. शनिवारी (ता. १२) विजयादशमीचा विजय मुहूर्त दुपारी २.२२ ते ३.०९ या कालावधीत असणार आहे अशी माहिती दाते पंचांग अभ्यासक राहुल देवा यांनी दिली.

आश्विन शु. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. ३) नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना होणार आहे. या दिवशी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करता येईल.

या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे. सोमवारी (ता.७) ललिता पंचमी असून गुरुवार (ता.१०) महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. शुक्रवारी (ता.११) महाष्टमीचा व नवमी उपवास एकाच दिवशी आहे. शनिवारी (ता.१२) नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आणि दसरा आहे. वयोमानामुळे किंवा आरोग्य विषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे ९ दिवस उपवास करणे शक्य नाही, त्यांनी उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र ते ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास करावा.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!