spot_img
spot_img

पारगाव,सावरगाव, बोरगांवात डी. जे. लावून स्वागत, सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन विकास केला – माजी आ. भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी) गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने माजी आमदार भीमराव धोंडे यांचे शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव,सावरगाव, बोरगांवात डी. जे. लावून स्वागत करण्यात आले.
मी सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास केला,
कडा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, कडा कारखान्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला तसेच देविनिमगाव येथे दर्गा बांधला, राजकारणात काम करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे असे प्रतिपादन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले.
नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या दोन महिन्यापासून सुरू केलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने १ ऑक्टोबर रोजी शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव,उकंडा (च), सावरगाव (च.), बोरगाव ( च. ), मातोरी, घोगस पारगाव,माळेगाव (च.),तिंतरवणी,शिंगारवाडी,
तरडगव्हाण या गावांचा दौरा केला.
पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की, पैठण ते पंढरपूर हा महामार्ग आष्टी मतदारसंघातील दळणवळणासाठी महत्वाचा ठरला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला. लोकसभा निवडणूकीत आ. पंकजाताई मुंडे यांचा झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. मी दोन महिन्यापासून दौरा सुरू केला आहे. येत्या आठवडाभरात संपूर्ण मतदारसंघ पिंजून झालेला असेल. येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. जल जीवनच्या योजना अनेक गावात झाल्या आहेत. त्यापैकी अनेक ठिकाणी बोगस कामे करण्यात आलेली आहेत, त्यामुळे शासनाने एवढा निधी देऊनही सर्वसामान्यांना त्याचा फायदा झाला नाही. मातोरी परिसरात देखील अनेक कामे केली आहेत. मी कधी कोणत्या कामात कमिशन घेतले नाही. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब हे माझे खरे मित्र होते. राजकीय जिवनात आम्ही एकमेकांना अनेकवेळा सहकार्य केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला तुतारी वाल्याकडून सतत संपर्क साधला जात आहे पण मी तुतारीकडे कधीच जाणार नाही असेही भिमराव धोंडे यांनी सांगितले. तिंतरवणी येथील शुभम खेडकर यांचा बी. ए. एम. एस. ला नंबर लागल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. तिंतरवणी येथे जून पासून आय टी आय सुरू करण्याचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले. तिंतरवणी येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माजी जि. प‌‌‌. सदस्य ‌अशोक सव्वाशे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवर भीमराव धोंडे यांचे नाव असणार हे निश्चित आहे. मातोरी गावात सव्वाशे यांनी सांगितले की,मनोजदादा जरांगे यांच्या
विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे उभे रहायचे का नाही हे तुम्ही ठरवावे. काही लोक म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असेही सांगितले.
यावेळी जि. प. सदस्य रामराव खेडकर यांनी सांगितले की माजी आ. भीमराव धोंडे हा कामाचा आणि हक्काचा माणूस आहे. त्यांच्या काळात मतदार संघात भरपूर विकास कामे झाली आहेत. त्यांनी कधीही जातीयवाद केला नाही. युवा नेते अजयदादा धोंडे यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कसलाही विकास झाला नाही.
जी कामे झाली त्या कामात कमिशन घेतले गेले त्यामुळे दर्जेदार कामे झाली नाहीत भविष्यात मतदारसंघाचा विकास करण्यासाठी धोंडे साहेबांना निवडून देणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ॲड. जयंतराव राख, जि. प‌‌‌. सदस्य रामदास बडे ,माजी सरपंच मोहन खेडकर, अशोकसाहेब खेडकर, माऊली पानसंबळ, संभाजी महाराज, महारुद्र खेडकर यांची भाषणे झाली. दौऱ्याच्या निमित्ताने माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सोबत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, जि. प. रामराव खेडकर, रामदास बडे, माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे, किशोर खोले, ॲड.जयंतराव राख, अंकुश मुंढे व इतर उपस्थित होते. ठिकठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेस सरपंच नवनाथ खेडकर, सरपंच राजेंद्र पानसंबळ, सरपंच शहादेव खेडकर, किशोर खोले, संतोष भैय्या सानप, माऊली पानसंबळ,उत्तम कोकाटे, सरपंच देविदास शिंदे, माजी सरपंच अभिमान जरांगे, अमर माळी, विजय जरांगे, भागवत येवले, भागवत शेळके, अभिजित गाडेकर,माजी सरपंच देवा गरकळ, ग्रा.पं. सदस्य भागवत खेडकर, मधुकर पानसंबळ, पांडुरंग नेहरकर, उत्तम व्हरकटे, अर्जुन पानसंबळ, अश्रुबा नेहरकर, रघुनाथ नेहरकर, आजिनाथ खेडकर, सुभाष पानसंबळ, जयसिंग खेडकर, सुरेश खेडकर, गौतम खेडकर, सुनिल लाटे, आजिनाथ ढाकणे, केशव ढाकणे, अंकुश ढाकणे, महादेव फुंदे, बाळू ढाकणे, अशोक खेडकर, जालिंदर खेडकर, भाऊसाहेब खेडकर,दादा जरांगे, सचिन खेडकर, अनिल सानप, विजय सानप, शहादेव सानप, राजेंद्र सानप, रामकिशन खेडकर, खाजाभाई शेख, माऊली कापरे, नारायण सानप, शिवदास खेडकर, हरिभाऊ खेडकर, रमेश खेडकर, परमेश्वर खेडकर,माजी सरपंच अभिजित खेडकर, प्रकाश खेडकर, देविदास खेडकर,महादेव खेडकर, श्रीराम खेडकर, माजी उपसरपंच निंबाळकर, विष्णू खेडकर, भागवत खेडकर, नारायण खेडकर, मुबारक शेख, भारती बाबा, अर्जुन गरकळ, संजय खेडकर, राजू खेडकर, अंबादास खेडकर, बाळू खेडकर, उपसरपंच छगनराव सांगळे, , नागेश खेडकर, रवीकुमार खेडकर, उद्धव खेडकर, माजी सरपंच बबनराव गरकळ, बाबासाहेब गरकळ, मधुकर गरकळ, भागवत मुकादम, उद्धव वनवे, अशोक जगताप, रवि गरकळ, गणेश खेडकर, धनंजय राख, नागेश राख, विलास सानप, सुकदेव सांगळे, गोरक्ष वारे, पांडुरंग दराडे, वसंत बारगजे, भागवत बारगजे व इतर उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!