पाथर्डी (प्रतिनिधी): सुसंस्कारित मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकासोबत पालकांची जागरूकता खूप महत्त्वाची असून शिक्षक,पालकांनी मुलांना जबाबदारीची जाणिव करुन देणं ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. चौरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ चौरे यांनी सर्व पालकांशी संवाद साधत महाविद्यालयातील सर्व परिसर सी सी टीव्ही कॅमेराच्या निगराणी खाली असून विद्यार्थ्यांच्या शिस्तीबद्दल विशेष काळजी घेतली जाते तसेच विद्यार्थी हितासाठी महाविद्यालयात राबवले जाणारे विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरती ,सी ई टी,नीट परीक्षा या बद्दल माहिती दिली.
याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून डॉ.श्रीधर देशमुख, ज्योती अधाट तुपे मॅडम, श्री रमेश गर्जे, श्री विठ्ठल देशमुख, श्री निलेश खाबिया,प्रा.मन्सूर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक व भौतिक सुख सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले. या शिक्षक पालक संवाद मेळाव्यासाठी प्रा.संदीप आमटे,प्रा.सचिन वणवे,प्रा.सचिन पालवे व सर्वच शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख,सूत्रसंचालन प्रा.सचिन पालवे तर आभार प्रा. देवेंद्र कराड यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.