spot_img
spot_img

छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी”दीक्षारंभ” फ्रेशर्स पार्टी संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय, आष्टी येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास “दीक्षारंभ – स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्राम – कनेक्टींग माईंडस- ” असे घोषवाक्य देण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासनाधिकारी डॉ. डी. बी. राऊत सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ हे होते. शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ.बी.बी.खेमगर, अन्नतंत्र महाविद्यालय प्राचार्य श्री. एस. एस.मोहळकर, इंजिनियरिंग महाविद्यालय प्राचार्य इ. संजय बोडखे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. संस्था, महाविद्यालय व द्वितीय वर्षातील विद्यार्थीच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सांस्कृतीक विभाग सदस्य प्रा. पी. आर. काळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रमुख पाहुणे डॉ.डी. बी. राऊत सर यांनी प्रथम वर्ष प्रवेश विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमराव धोंडे साहेब यांच्या शैक्षणिक कार्याचा आलेख थोडक्यात मुलांपुढे सादर केला. चार वर्ष महाविद्यालयामध्ये वास्तव्यास असताना सर्व शैक्षणिक सुविधांचा फायदा घेऊन आपलं भविष्य कसे चांगल्या प्रकारे घडविता येईल यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ यांनी महाविद्यालय स्थापनेपासून महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जावर प्रकाश टाकला. आज पर्यंत वीस बॅच उत्तीर्ण होऊन गेलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी सरकारी निमसरकारी नोकरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे, काही विद्यार्थी यशस्वी व्यावसायिक म्हणून काम करत आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी बँकेमध्ये नोकरी स्वीकारली आहे, काही विद्यार्थी खाजगी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत तसेच विद्यार्थी आपल्या शेतीवर नवनवीन प्रयोग करून अर्थ अर्जंनय करत आहेत. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्यांनी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार ओ.पी.गुंड व कुमारी पी.एम.लटपटे यांनी तर आभार प्रदर्शन कु. व्ही. ए. काटे यांनी केले.
यानंतर प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये काही मनोरंजनाचे उपक्रम राबण्यात आले होते. ज्यामध्ये फिश पॉइंट्स, गायन, नृत्य इत्यादीचा समावेश होता. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी मुलांमधून श्री. फ्रेशर्स श्री. जी . यशवंत व मुलींमधून फ्रेशर्स कुमारी ई.डी.क्षेत्रे यांना मुकुट , पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले‌. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कुमारी पी.जी.घुले व कुमार पी.के.चत्रे केले. फिशपोंड्स वाचन कुमारी व्ही.डी.ससाणे व कुमारी के .आर.रहाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी डी.व्ही.राठोड हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस.एल. बनकर , प्रा.पी.आर.काळे, प्रा. बी. आर. गुंजाळ, प्रा.डी.सी.सातव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी संगीत नियोजन प्रा. एस.आर.देसाईपाटील व एन. एन. राऊत यांनी केले.कार्यक्रमासाठी महविद्यालयतील सर्व वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!