आष्टी ( प्रतिनिधी)बापूसाहेब डोके यांनी आष्टी मतदार संघातील गावागावांतील नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला ठिकठिकाणी तरुणांनी व ग्रामस्थांनी बापूसाहेब डोके यांचे उत्साहात स्वागत केले.
आष्टी तालुक्यातील देवळाली घाटा पिंपरी धामणगाव कडा टाकळी येथे त्यांनी भेट दिली असता तेथील असंख्य ग्रामस्थांनी बापूसाहेब डोके यांचे जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब डोके यांनाच आमदार करणार असे सांगून आपला पाठिंबा जाहीर केला.
देवळाली येथे चैतन्य स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर बापूसाहेब डोके म्हणाले की आजही सामान्य माणूस प्रगती पासून व विकासापासून कोसो दूर राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट यांच्याकडे मी विधानसभेच्या तिकिटाची मागणी ही केली आहे सर्वांच्या आशीर्वाद सहकार्य लाभले तर आता गुलाल आपलाच व आपण तो सर्वांच्या सहकार्याने व चैतन्य स्वामींच्या आशीर्वादाने मोठ्या उत्साहात उधळू बापूसाहेब डोके यांनी यावेळी देवळाली व परिसरातील एमबीबीएस एमपीएससी पास झालेले व शिक्षण घेऊ असलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी देवळाली व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते