*तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री विवेकानंद विद्या मंदिरला विजेतेपद*
*पाथर्डी प्रतिनिधी* : अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा नुकत्याच एम. एम.निराळी विद्यालयात संपन्न झाल्या. या स्पर्धेत पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिरच्या संघांने श्री निंबादैत्य माध्यमिक विद्यालय नांदूर, एम. एम. निराळी विद्यालय पाथर्डी व श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी या संघावर मात करून विजेतेपद पटकाविले. सर्व संघांचा सत्कार समारंभ नुकताच विद्यालयाच्या वतीने संपन्न झाला.
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील १४ वर्ष वयोगट मुले, १७ वर्षे वयोगट मुले, व १७ वर्ष वयोगट मुली या सर्व संघांनी अंतिम मजल मारून विजेतेपद पटकावले व या सर्व संघांची जिल्हास्तराय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले की आजच्या या स्पर्धेच्या युगात निरोगी जीवन अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. या निरोगी जीवनासाठी शालेय वयापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर व्यायाम व विविध खेळ करावेत ही काळाची गरज निर्माण झाली आहे. मैदानावर खेळल्याने विद्यार्थी शारीरिक सुदृढ बनतात. खरे तर खेळाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जातो असे यावेळी म्हणाले.
सत्कार कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष एडवोकेट सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ.बी. ए. चौरे ,मुख्याध्यापक शरद मेढे, प्रा. अशोक कानडे, प्रा. अजय पालवे,पर्यवेक्षक संपत घारे,मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सतीश डोळे, रावसाहेब मोरकर,प्रमोद हंडाळ, भैया थोरात, मनोज ढाकणे , कार्तिक कराड व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.