धामणगाव (प्रतिनिधी) रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने बीड – अहिल्यानगर रस्त्यावरील धामणगाव येथे युवा नेते विजय(आण्णा )गाढवे यांच्या नेतृत्वात खड्ड्यांत झाड लावून आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभाग “बेशरम”झालाय काय? असा खडा सवाल धामणगाव येथिल तरुणांनी केला आहे. नुसता सवाल करून थांबले नाहीत तर त्यांनी खड्या चे पुजन करून झाड लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केलाय. युवा नेते विजय( आण्णा) गाढवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय (आण्णा )गाढवे यांच्यासह तरुणांची उपस्थिती होती.