spot_img
spot_img

आमदार मोनिका राजळे यांचे कुशल नेतृत्वामुळे बाजार समितीची भरभराट -: चेअरमन सुभाष बर्डे

पाथर्डी( प्रतिनिधी)आमदार मोनिकाताई राजळे यांचे कुशल नेतृत्व व शेतकऱ्या बद्दलची उत्कर्षाच्या भावनेमुळे मार्केट कमिटी ताब्यात आल्यानंतर गेल्या एक वर्षातच संस्थेची व शेतकर्याची भरभराट होत आहे. असे प्रतिपादन मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे यांनी केले.
पाथडी येथील बाजार समिती आवारात १५ ते २५ फुट, पाच आठ वर्ष वयाच्या विविध क्रेनच्या सहाय्याने वृक्षांचे वृक्षारोपण सभापती सुभाष बर्डे व संचालकांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपसभापती कुंडलिकराव आव्हाड संचालक नारायण पालवे, पाडूरंग लाड , गोरक्ष ढाकणे. संस्थेचे सचिव बाळासाहेब बोरुडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बर्डे म्हणाले बाजार समितीच्या निवडणुकीनंतर मागील वर्षी जेव्हा भाजपच्या ताब्यात आली त्यावेळी येथील परिसराची अत्यंत दैन्नीय अवस्था झालेली होती. मागील पाच वर्षात कोणताही विकास झाला नाही, त्यामुळे विकासाचा अनुशेष भरून काढणे खूप अवघड गोष्ट होती. मात्र आमदार मोनिकाताई राजळे यांचे कुशल नेतृत्व व संचालक मंडळाच्या सहकार्याने नियोजनात्मक कामे केल्यामुळे बाजार समिती अतिशय चांगल्या दर्जाची नावारुपाला आली .
पाथर्डी हे ठिकाण मराठवाडा व नगर जिल्हा यांना जोडणारा भाग असल्यामुळे येथे नगर जिल्ह्या समवेत बीड, गेवराई, येथील शेतकरी मोठ्या संख्येने शेतीमालाची विक्री करतात त्यांना शेतीमालाला व्यवस्थित भाव मिळावा , सुविधा मिळाव्यात या प्रामाणिक भावनेतून आम्ही काम करत आहोत. मात्र हे शक्य झाले ते आ.राजळे यांच्या मार्गदर्शनामुळे
पुढील पाच वर्षात शेतकरी हिताचे जास्तीत जास्त निर्णय घेऊन आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही खरे उतरू असे बर्डे म्हणाले
संस्थेचे सचिव बाळासाहेब बोरुडे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले.
दरम्यान मोठ्या झाडांचे क्रेनच्या सहाय्याने वृक्षारोपण हा पाथर्डी तालुक्यात प्रथमच मार्केट कमिटीत उपक्रम राबवण्यात आला.
==================

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!