spot_img
spot_img

ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन पदी वसंतराव गर्जे

पाथर्डी ( प्रतिनिधी ) ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन पदी नुकतीच वसंतराव गर्जे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .मावळते चेअरमन सुरेश नागरे यांनी राजीनामा दिल्यामुळे चेअरमन पद रिक्त झाले होते. या पदासाठी पाथर्डीतील सहकारी संस्थेच्या कार्यालयात सहकार अधिकारी   तथा निवडणूक निर्णय अधिकारी पि पी डगळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत वसंतराव गर्जे यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी वसंतराव गर्जे त्यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांना सुचक परमेश्वर टकले तर अनुमोदक अशोक बनसोड हे होते . चेअरमन पदासाठी गर्जे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्राचे निवडणूक आधीकरी  डगळे यांनी जाहीर केले . संस्थेचे सचिव शांतीलाल गायकवाड यांनी मीटिंग चे कामकाज यशस्वी पार पाडले, 

गर्जे यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.

          त्यावेळी गर्जे म्हणाले सर्वांना बरोबर पारदर्शकपणे  संघाचा कारभार करण्यात येईल. संघाच्या मार्फत बारा बलुतेदार, गरीब गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त व्यावसायिक कर्ज मिळवून देऊन  त्यांना लाभ  मीळण्यासाठी प्रयत्न करनार संचालक मंडळ व सर्व ज्येष्ठ नेते यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे ,त्या विश्वासास मी पात्र राहून ख उमचद्योग संघाचा व छोटे  व्यवसायिकाच्या  हिताचे निर्णय घेतले जातील असे गर्जे म्हणाले.यावेळी संचालक संतोष जाधवर  गोविंद  दातीर  ज्योती मंत्री  व्हा चेअरमन शीतल अशोक चन्ने  मारुती सांगळे ,विजय तरटे  सुरेश नागरे  आदी या निवडणुकीसाठी उपस्थित होते.

 ही निवड यशस्वी पार पाडण्यासाठी  माजी चेअरमन भगवान बांगर   जेष्ट नेते अशोक गर्जे सोनू सारुक, शेषराव बेळगे शरद गर्जे, राजू पठाण  ,जयदत्त गर्जे, सचिन पंडित  कृष्णा धायतडक, मुकुंद गर्जे, पंडित गर्जे, अशोक चन्ने, संदीप बनसोड, आनंद बनसोड यांनी  सहकार्य केले .

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!