spot_img
spot_img

पाच वर्षात कोणाला त्रास होईल असे एकही चुकीचे काम आपण केले नाही – आ.बाळासाहेब आजबे चिंचाळा येथे आ.आजबे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

आष्टी(प्रतिनिधी)गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक गावात आवश्यक असणारी विकास कामे त्यामध्ये विषश करून जलसंधारणचे बंधारे ,रस्ते सभा मंडप,या कामाला प्राधान्य देऊन आपण मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे विकासाचे काम करत असताना कोणतेही चुकीचे काम होणार नाही याच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिले. कोणाला त्रास होईल असे एकही चुकीचे काम आपण गेले पाच वर्षात केले नाही जनता जनार्दनाच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचाळा येथील शेतकऱ्यांना आंबा,चिंच झाडांचे वाटप सरपंच पंडित पोकळे चिंचाळा राघापूर ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 22 जुलै रोजी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे ,दशरथ दादा वनवे, सोपान बापू पवार युवा नेते यश भैया आजबे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते चिंचाळा फाटा येथे देसुर रस्त्याचे डांबरीकरण चार कोटी रुपये ,गेटेड सिनेमा क्रमांक एक 25 लक्ष रुपये ,चिंचाळा राघापूर ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम 20 लक्ष रुपये, चिंचाळा मारुती मंदिर सभा मंडप 10 लक्ष रुपये ,चिंचाळा गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे 20लक्ष, गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष ,गावा शेजारील पूल करणे 50 लक्ष, गावांतर्गत प्लेयिंग ब्लॉक बसवणे 20 लक्ष ,पाटील वस्ती नळकांडी पूल करणे 10 लक्ष , सिमेंट रस्ता करणे 10लक्ष, चिंचाळा गावांतर्गत पांदण रस्ते 50 लक्ष ,असे एकूण 06 कोटी 25 लाख रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन व 90 लक्ष रुपये किमतीच्या कामाचे लोकार्पण आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचाळा येथे विविध विकास कामाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा साजरा होत आहे प्रत्येक गावामध्ये आवश्यक असणारे कामे आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 1100 कोटी रुपये किमतीच्या खुंटेफळ साठवण तलाव योजनेचेकामाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे शिंपोरा ते
खुंटेफळ पाईपलाईनचे काम सुरू असून हे काम वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. गावागावात रस्ते बंधारे व गाव अंतर्गत कामे केली आहेत मतदारसंघात जवळपास 300 ते 400 पांदण रस्ते मंजूर करून पांदण रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येक वस्ती गावाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे मतदारसंघाच्या वाट्याचे सहा टीमचे पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून महाराष्ट्रात सर्वात जास्त बंदारे करण्याचे काम आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात आपण केले आहे. प्रत्येक गाव पाणीदार व्हावे व शेतकरी सुखी व्हावा हीच आपली इच्छा असून त्यासाठी आपण सहा टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, पाच वर्षात कोणाला त्रास होईल असे कधी वागलो नाही आणि कोणालाही त्रास दिला नाही आमदार हा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी असतो भांडणे लावण्यासाठी नाही, वेळ आल्यावर सर्व जनतेसमोर मांडू ,आपण कधी विकास कामात राजकारण आणले नाही,विरोधकांना बरोबर घेऊन सर्व कामे केली आहेत .प्रत्येक गावात दहा लक्ष रुपये असे एकूण 13 कोटी रुपयांची सभामंडप आपण मतदार संघात आणले असून त्यांची कामे ही सुरू झाली आहेत, सहा सोलर सब स्टेशनला मंजुरी मिळाली आहे गायरान जमिनीवर सोलर सब स्टेशन साठी प्रयत्न करणार जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल लाडकी बहीण योजनेचे अर्ज सर्वांनी भरून घेण्याचे आवाहनही शेवटी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी केले यावेळी चिंचाळा गावचे सरपंच पंडित पोकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर काकासाहेब शिंदे सतीश आबा शिंदे डॉक्टर शिवाजी राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी राधाकिसन पोकळे गणपत पाटील पोकळे पांडुळे साहेब दिगंबर पोकळे नाना पंडितांना पोकळे बाळासाहेब पोकळे सर्व ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गायकवाड पंडितराव करांडे सरपंच बीडसांगवी रमेशराव भोगाडे गणेशराव पडोळे उपसरपंच केळ सांगवी नगरसेवक नाजीम शेख, संदीप गदादे उपसरपंच जळगाव उमेश जगताप विजय भाऊ मुटकुळे पत्रकार यांच्यासह गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!