आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी (देवळाली) या छोट्याशा गावातील कु. मयुरी रमेश आब्दार या तरुणीने एमबीबीएस चे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे तसेच भारतामध्ये घेतल्या गेलेल्या एफ.एम.जी.ई या परिक्षेमध्ये देखील यश मिळविले आहे तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे तिच्या या यशाचे कौतुक म्हणून देवळाली ग्रामस्थांच्या वतीने तिचा भव्य नागरी सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले देवळाली व परिसरातील एमबीबीएस शिक्षण झालेली मयुरी ही पहिलीच डॉक्टर आहे.
जिद्द चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर यशाला गवसणी घालायला वेळ लागत नाही हे ध्येय उराशी बाळगलेल्यांना परिस्थिती कधीही आडकाठी बनत नाही याचे उदाहरण म्हणजे डॉक्टर मयुरी आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी(देवळाली)सारख्या छोट्याशा गावातून आलेली मयुरी हिला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न होते मयुरीचे वडील कडा येथील अमोलक जैन कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर आई एक उत्तम गृहिणी आहे तसेच देवळाली गावचे माजी सरपंच बबनराव तळेकर यांची ती नात बबन आब्दार(टेलर)यांची पुतणी आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तिला चांगले गुण मिळाल्याने पुढील शिक्षण वैद्यकीय शिक्षणासाठी ती न्यू विजन युनिव्हर्सिटी जॉर्जिया युरोप येथे गेली तिथे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले तसेच भारतामध्ये घेतल्या गेलेल्या या एफ.एम.जी.ई परीक्षेमध्ये देखील यश संपादन केले एका छोट्याशा गावातील तरुणीने मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे.