spot_img
spot_img

गुरूला देवासारखे पूजनीय मानावे – ह. भ .प सुदर्शन महाराज कारखेले

आष्टी ( प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली गावामध्ये दि.२१ जुलै रोजी चैतन्य स्वामी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर कीर्तन सेवेला सुरुवात झाली.

या प्रसंगी कीर्तन सेवा देताना ह.भ.प. सुदर्शन महाराज कारखेले यांनी प्रतिपादन केले की हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते.
ज्यांचे मन शांत आहे त्यांना मंदिरात जाण्याची गरज नाही. ब्रम्हांडात कुठेही फिरा पण चरणाला हात लावून दर्शन नाही
फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच एकट्या पंढरपूर मध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी यांचे चरण स्पर्श करता येतो . गुरुपौर्णिमेचे महत्व सुदर्शन महाराजांनी समजावून सांगितले गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी लागली होती या कीर्तना सेवेसाठी देवळाली व परिसरातील भाविक भक्तांची गर्दी उसळली होती या कार्यक्रमाला सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास खाडे सर यांनी केले नंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!