spot_img
spot_img

गुरुपौर्णिमेनिमित्त देवळाली येथे सुप्रभात मित्र मंडळातर्फे वृक्षारोपण

देवळाली(प्रतिनिधी)तालुक्यात देवळाली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सुप्रभात मित्र मंडळाने वृक्षारोपण करून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.

निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांनी केले.वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन डॉ कल्याण पवार यांनी केले.
वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या सुप्रभात मित्र मंडळाने केला आहे. सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे या वेळी डॉ कल्याण पवार, सुनील खाडे,अशोक तांदळे, दादा खाडे, गणेश खाडे,जालिंदर पवळे पत्रकार अतुल जवणे हे उपस्थित होते

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!