आष्टी (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याअंतर्गत आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नातून आष्टी तालुक्यातील देवळाली मेंढवाडी(देवींची वस्ती)ते घाटा या ग्रामीण रस्त्यासाठी 4 कोटी74 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या रस्त्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे शरद तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे वारंवार मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी हा रस्ता राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला आहे हा रस्ता मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन व कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे देवळाली ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत .अशी माहिती शरद तळेकर यांनी दिली आहे.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी या रस्त्याबरोबरच आणखी दहा रस्ते कामासाठी 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते होणार असून कायमस्वरूपी या भागातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागनार आहे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून आष्टी मतदार संघात विकासाची गंगा वाहत असून हे कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे शरद तळेकर यांनी सांगितले.