आष्टी (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 ( बॅच – 1) संशोधन व विकास अंतर्गत आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील रस्त्यांची दर्जेन्नती करण्यासाठी 51 कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून लवकरच या कामाचे टेंडर निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आ. बाळासाहेब आजबे यांनी दिली.
आष्टी – पाटोदा – शिरूर विधान सभा मतदार संघातील रस्त्यांची दर्जेन्नती करण्याची मागणी आ. बाळासाहेब आजबे यांनी केली होती. या मागणीला यश आले असुन तीन तालुक्यातील रस्ते विकासासाठी 51 कोटी रुपये मंजूर झाले आहेत हा निधी मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन व कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाला असल्या मुळे आपण मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील पुढील प्रमाणे रस्ते विकास कामामध्ये आहेत 1)प्र. रा. मा. 16 – पिंपळवंडी जवळ अश्वलिंग खोपटी रस्ता कि. मी. 0/00 ते 5/00 किंमत 5 कोटी 28 लक्ष रूपये, 2)प्रजिमा – 19 ब्राम्हणवाडी रस्ता ग्रा. मा. 99 कि. मी. 0/00 ते 3/240 मध्ये सुधारणा करणे किंमत 4 कोटी 60 लक्ष रूपये, 3)प्रजिमा – 3 चिखली जवळ ते येवले वस्ती रस्ता ग्रा. मा. 105 कि. मी. 0/00 ते 3/210 मध्ये सुधारणा करणे किंमत 3 कोटी 61 लक्ष रूपये, 4)प्र.रा.मा – 16 पिंपळवंडी ते आंबेवाडी – चंद्रेवाडी रस्ता ग्रा. मा. 11 कि. मी. 0/00 ते 3/500 मध्ये सुधारणा करणे किंमत 4 कोटी 36 लक्ष रूपये, 5)रा. मा. – 62 आंनदवाडी जवळ ते माऊलीनगर बोरगाव सावरगाव ग्रा. मा. 111 कि.मी. 0/00 ते 4/00 मध्ये सुधारणा करणे किंमत 5 कोटी 69 लक्ष रूपये, 6)प्रजिमा- 01 पिंपरखेड ते कुंभारवाडी रस्ता ग्रा. मा. 47 कि.मी. 0/00 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे किंमत 4 कोटी 34 लक्ष रूपये, 7)प्ररामा- 16 ते मैंडवाडी- देवळाली रस्ता ग्रामा 19 कि. मी. 0/00 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे 4 कोटी 74 लक्ष रूपये, 8)प्रजिमा- 01 कुंबेफळ – बाळेवाडी रस्ता ग्रामा 81 कि. मी. 0/00 ते 4/500 मध्ये सुधारणा करणे किंमत 6 कोटी 49 लक्ष रूपये, 9)रा. मा. 70 ते बळेवाडी प्रजिमा- 12 पर्यंत रस्ता ग्रा. मा. 175 कि. मी. 0/00 ते 3/100 मध्ये सुधारणा करणे किंमत 4 कोटी 53 लक्ष रूपये, 10)प्ररामा 16 उंदरखेल ते कारखेल खु. जवळ ग्रा. मा. 45 कि. मी. 0/00 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे किंमत 4 कोटी 28 लक्ष रूपये, 11)प्रजिमा- 02 ते इमणगाव ते शिंदेवस्ती रस्ता ग्रामा 260 कि. मी. 0/00 ते 2/250 मध्ये सुधारणा करणे किंमत 3 कोटी 14 लक्ष रूपये या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 ( बॅच – 1) संशोधन व विकास अंतर्गत असते मतदार संघातील रस्त्यांची दर्जेन्नती करण्यासाठी 51 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. बाळासाहेब आजबे यांनी दिली. मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आपण महायुती सरकारचे आभार मानत असून यापुढेही विकास कामासाठी आपण कधीबद्ध असल्याचे आमदार यांनी शेवटी सांगितले.