पाथर्डी (प्रतिनिधी):- सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व तुम्ही स्विकारलं तर तुमचा विकास होऊ शकतो, नसता प्रस्थापित कारखानदार पुढारी तुमचा गेली पन्नास वर्षापासून वापर करत आलेली आहेतच. एकदा नवीन चेहऱ्याला संधी द्या तुमच्या प्रश्नाला मी नेहमी बांधील राहील व दोन्ही तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. जनतेच्या प्रश्नासाठी आता माघार नाही. विधानसभा करायची ती फक्त गोरगरिबांसाठीच असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीच्या नेत्या मा. जि.प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी आज पाथर्डी येथे केले.
आज पाथर्डी येथे जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने “निर्धार मेळावा व नूतन जनशक्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा” पार पडला. यावेळी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव चोरमारे हे होते, तर कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, ह.भ.प. माऊली महाराज फटांगडे, गहिनीनाथ थोरे, बाळासाहेब कचरे, विनायक देशमुख, सचिन नागापुरे, महेश दौंड, अशोक मरकड, उबेद आतार, साईराज लांडगे, माणिक गर्जे, धनराज घोडके, सुरेश चौधरी, अशोक ढाकणे, पंडित नेमाने, भगवान डावरे, वैभव पूरनाळे, अतुल केदार, भागवत भोसले, नामदेव ढाकणे, रामकिसन सांगळे, नितीन कुसळकर, अकबर शेख, माणिक काळे, मधुकर गोरे, लक्ष्मण टाकळकर, भागचंद आठरे, सुरेश कुठे, रंगनाथ ढाकणे, अशोक शिरसाठ, नामदेव कसाळ, संजय काकडे, सचिन आधाट, विष्णू दिवटे, राजेंद्र पोटफोडे, भारत लांडे, चंद्रकांत गायकवाड, गणेश गर्जे, रमेश दिवटे, गणेश उगले, देविदास गिऱ्हे, आदी प्रमुख उपस्थितीत होते.
पुढे बोलतांना सौ काकडे म्हणाल्या की, सन 2014 साली आमचे मिळालेले तिकीट चोरून नेले. त्यानंतर आम्हाला सतत टाळून आमचे खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम लोकप्रतिनिधींनी केला. वास्तविक त्यांना काम करण्यासाठी दहा वर्षे लोकांनी सत्ता दिली, परंतु त्यांनी भरीव काम केले नाही. आज कोणतीही कामे टक्केवारी शिवाय होत नाहीत ही टक्केवारी मोडून काढण्याचे काम आता मी करणार आहे. आम्ही शेवगाव पाथर्डीमध्ये एम.आय.डी.सी.साठी प्रयत्न केले परंतु त्यांनी त्या कामात खोडा घातला. दोन्ही तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न जसेच्या तसेच आहेत. आलटून पालटून हे साखर सम्राट सत्ता उपभोगत आहेत. त्यांची मिलीभगत आहे. निवडणूक आली की हे बिळातून बाहेर पडतात. सर्वच पक्षात यांनी माणसं पाठवले आहेत. यांना वेळीच ओळखा व यावेळी नवा चेहरा म्हणून मला एक वेळ संधी द्या असेही सौ काकडे म्हणाल्या. यावेळी ॲड.शिवाजी काकडे म्हणाले की, शरद पवार साहेबांनी दहिगावकरांना सर्व पदे दिली. कारखाना, जिल्हा बँक, आमदारकी, राज्य बँक, जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले तरीही यांनी मा.पवार साहेबांची संकटात साथ सोडली. अहो ज्या पवार साहेबांनी एवढे देऊनही हे त्यांचे होऊ शकले नाही ते तुमचे आमचे गरिबांचे काय होणार. त्यामुळे जनतेने आता त्यांना ओळखलं आहे. आता सौ.हर्षदा काकडे यांना दोन्ही तालुक्यातून व्यापक प्रमाणात पाठिंबा सर्व जाती-धर्माचा, गोरगरिबांचा मिळत आहे. त्यामुळे आता या प्रस्थापित मातब्बरांना जनता घरी बसवणार असून सौ.हर्षदा काकडे यांच्या नवीन चेहऱ्याला विधानसभा निवडणुकीत संधी देणार हे निश्चित आहे. यावेळी लक्ष्मण गवळी, जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्वर फटांगडे, माणिक गर्जे, सचिन नागापुरे, विनायक देशमुख गुरुजी,सुनील चव्हाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागचंद कुंडकर यांनी सूत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी तर आभार अशोक पातकळ यांनी मानले.