आष्टा हरिनारायण (प्रतिनिधी) पूर्वीच्या काळात शिक्षण घ्यायचे असेल गुरुकुल पद्धत ही अवलंबिवली जायची परंतु जसे जसे जग बदलत गेले तशी तशी आधुनिक पद्धत समोर येऊन शिक्षण पद्धतीतही बदल झाले मात्र जगातील कोणत्याही बदलापुढे न जाता गुरु शिष्याचे एक अतूट नाते आजही कायम असून याचीच प्रचिती म्हणून गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी आष्टी तालुक्यातील मातकुळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये पाहायला मिळाली.गुरूर्ब्रमहा, गुरूर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा!गुरु:साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः गुरूप्रतीअसलेले प्रेम, गुरू म्हणजे देव आणि गुरुप्रती असलेल्या मंत्रांचे पठण करुन देवासमान असलेल्या आपल्या गुणवंत शिक्षक खेमगर सरांचा वाढदिवस येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
गुरूवार दिनांक १८/५/२०२४ रोजी नियमीत शाळेच्या वेळेनुसार शाळा भरली आणि प्रार्थना व परिपाठ झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय व गुणवंत शिक्षक खेमगर सरांचा वाढदिवस केक कापुन व शाल श्रीफळ पुच्छगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी वाढदिवस साजरा केल्याबद्दल खेमगर सरांनी भावनिक होऊन आभार मानले तसेच विद्यार्थ्यांचे यश हीच आपली मानसिकता असुन विद्यार्थ्यांना घडवणे हेच आपले ध्येय असून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले तरच मनाला आनंद वाटतो तसेच विद्यार्थ्यांचे यश हिच गुरुची गुरूदक्षिणा असते जो पर्यंत ज्ञानदानार्जाचे काम करील तो पर्यंत प्रामाणिक करेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यशाच्या रांगेत पाहील असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच बबन दादा डोके, उपसरपंच विशाल आबा जरे, डॉ. आप्पा डोके, पत्रकार गहिनीनाथ पाचबैल, बंकट पाचबैल, अनील डोके, श्रीराम जरे, जेष्ठ शिक्षक सिताराम माने, महाव्दार सर, गळगटे सर, नागरगोजे सर, श्रीमती डमाळे मॅडम, दिपक वीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.