पाथर्डी (प्रतिनिधी)सौ लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अंगणवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या विद्यालयात दिनांक १६-७-२०२४ वार बुधवार या दिवशी आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुले मुली विठू नामाचा गजर असा भक्तिमय सोहळा आल्हन वाडीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रंगला होता विठ्ठल रुखमाई संत ज्ञानेश्वर तुकाराम अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले न्यू इंग्लिश स्कूल आयोजित दिंडीमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता टाळ मृदुंग व विठू नामाचा विठू नामाच्या गजराने आल्हन वाडी परिसर दुमदुमला वारकरी दिंडी सोहळ्यात तुळशी पताका टाळ घेऊन विठ्ठल झालेले विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी मुख्याध्यापकासह सर्व कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.