पाथर्डी (प्रतिनिधी)पाथर्डीतील कसबा पेठेमधील श्री.धन्वंतरी योग व फर्टिलिटी सेंटर याठिकाणी वै.रामकृष्ण देशमुख तथा बाबा यांचे स्मरणार्थ हाडांचा ठिसूळपणा मोजण्यासाठीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते..या शिबिरात हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करून आयुर्वेद ,योग व आहाराच्याद्वारे औषधोपचार या दृष्टीकोनातून डॉ.श्रीधर व डॉ.सौ.ज्योती देशमुख यांनी मार्गदर्शन केले.पाथर्डी व परिसरातील सुमारे १८६ रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
तंत्रज्ञ अनंत जोशी यांनी एल अमर नॅचरल प्रोडक्टस् या कंपनीच्या माध्यमातून बी.एम.आर.टेस्ट केली.
यावेळी पाथर्डीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानच्या माध्यमातून गत दहा वर्षापासून सुमारे १५० विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते.
या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाथर्डीचे मा.नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,उमेश मोरगांवकर ,प्रभाकर मुळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी नगर दक्षिणेत सकाळ माध्यम समूहासाठी उत्कृष्ठ कामगिरी करणा-या श्री.उमेश मोरगांवकर यांचा सन्मान करण्यात आला.
श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा श्री.जगदंबादेवी सार्वजनिक न्यासचे विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सौ.ज्योती देशमुख यांनी आभार मानले.
यावेळी संदीप ईनामदार, देवेन्द्र जोशी, सिद्धेश्वर दिक्षे,प्रणव देशमुख,वैशाली कुलकर्णी,रवींद्र कुलकर्णी,अजय गरड,भुजंग डमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.