मुंबई ( प्रतिनिधी)वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात.
आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. आळंदी मधून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील दिवे घाटामधील नयनरम्य दर्शन घडवणारे दृश्य भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेतील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून शाळेच्या दर्शनी फलकावर साकारत, सर्वांचे लक्ष वेधत आहे.