पाथर्डी (प्रतिनिधी):- अ.नगर जिल्हा मोबाईल रिटेल असोसिएशन व पाथर्डी तालुका मोबाईल रिटेल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
शहरातील चोंडेश्वरी मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे ८० रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला.
या असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण रोपण, वृक्ष संवर्धन, मतिमंद मुलांना गणवेश वाटप असे उपक्रम घेतल्या जातात. या वर्षी जिल्हा मोबाईल असोसिएशन, आय लव नगर, आ. संग्राम जगताप सामाजिक प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहर व इतर ठिकाणी महा रक्तदान शिबीर पार पडत आहेत. त्याअनुषंगाने हे शिबिर घेण्यात आले. यासाठी पाथर्डी मोबाईल असोसिएशनचे सभासद आणि जीवणज्योत रक्तदान ग्रुप चे अध्यक्ष सूर्यकांत काळोखे यांचे मोलाचे योगदान लाभले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी गौतम भंडारी, सुरेश गोरडे, प्रतिक दहिफळे, नितीन नरवणे, अनुप उगार, विपुल निर्हाळी,
नारायण केदार यांनी विशेष परिश्रम घेतले.