पाथर्डी (प्रतिनिधी):-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही राज्यातील महायुती सरकारची महिलांसाठीची कल्याणकारी योजना सर्व सामान्य महीला भगिनी लोकप्रिय होत असुन सर्व स्तरातील माता भगिनींकडुन या योजनेचे स्वागत होत आहे. परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल कर्मचारी कमी पडत आहे. त्यातच भर म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू असुन सोमवार पासून ते कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत.
यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुश चितळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुरेसे मनुष्यबळ या योजनेसाठी देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील महीला वर्ग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे धन्यवाद व्यक्त करत आहे.
ही योजना घरोघरी पोहचवली जावी या उद्देशाने तालुक्यातील शिवसेना, भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी संपूर्ण शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मेहनत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक ग्रामीण भागातील महिला भगिनींना या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही या योजनेसाठी विशेष मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी महीलांची विविध ठिकाणी, तहसील कार्यालय, बॅंका, आधार अपडेट, मोबाईल लिंकींग, खाते केवायसी अपडेट इ. साठी गर्दी होत आहे. परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय पातळीवर मनुष्यबळ कमी पडत असल्याचे जाणवत आहे. यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुश चितळे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विनंती पत्र लिहिले असून या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की, तहसील कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने येथे कर्मचारी उपलब्ध व्हावेत, किंवा महीला बालकल्याण व इतर शासकीय विभागातील कर्मचारी यांची तात्पुरती नियुक्ती करावी. किंवा या योजनेसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावेत अशी विनंती चितळे यांनी पत्रात केली आहे.
याचवेळी चितळे यांनी मुख्यमंत्री शिंदे, शिवसेना पक्ष, शिवसेनेचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार भावना गवळी व कृपाल तुमाने, पंकजाताई मुंडे, शिवाजीराव गर्जे व इतर महायुतीच्या आमदार यांचे अभिनंदन केले आहे. चितळे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या अपप्रचारानंतर ही शिवसेना पक्षाला चांगले यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीत ही महायुतीच्या सर्व जागांवर यश मिळवुन देत विधानसभा सभागृहात आपला दबदबा कायम असल्याचे विरोधकांना दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्यात चांगले यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.