spot_img
spot_img

राष्ट्रसंत आनंदॠषीजी जन्मोत्सवानिमित्त छ. संभाजीनगर येथे २१०० तपस्वींच्या अठ्ठाई तपाचा संकल्प व भव्य आयोजन

पाथर्डी (प्रतिनिधी):- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांचे सुशिष्य अर्हम विज्जा प्रणेता प्रविणऋषीजी महाराज यांच्या सानिध्यात दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आचार्यश्रींचा १२५ वा जन्मोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे साजरा होणार आहे. १२५ व्या आनंद जन्ममहोत्सवात नवकार मंत्र सामुहिक जाप आदी अनुष्ठान कार्यक्रमाबरोबर २१०० अठ्ठाई तप तपस्वींकडून करविण्याचा संकल्प उपाध्यायश्रींनी केला आहे

अग्रसेन भवन सिडको, छ. संभाजीनगर येथे उपाध्याय पूज्य प्रविणऋषीजी महाराज आदीठाणा २ व महासती प्रीतीदर्शनाजी महाराज आदीठाणा ५ यांचा चातुर्मास उत्साहात संपन्न करण्यासाठी संभाजीनगर सकल जैन समाजाची पूर्वतयारी जोरात सुरु आहे. इंदोर, रायपूर येथील ऐतिहासिक चातुर्मास संपन्न करून उपाध्यायश्रींचे ३ वर्षांनी महाराष्ठात चातुर्मास निमित्त आगमन झाले आहे. पुणे येथे भव्य महावीर गाथा, १००८
वर्षी तप धारणा आदी कार्यक्रम करीत अहमदनगर, चिचोंडी, शिर्डी अनेक स्थानांना पदस्पर्श, धर्म प्रभावना करीत लाखो गुरुभक्तांना आपल्या प्रभावी वाणीने मार्गदर्शन करीत उपाध्यायश्रींनी संभाजीनगरात प्रवेश केला आहे. उपाध्यायश्रीजी दि. १५ जुलै रोजी चातुर्मास स्थानी प्रवेश करणार आहेत. पहिल्या भव्य कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये गुरू आनंद जन्ममहोत्सवात २१०० आनंद अठ्ठाई तप महोत्सवाचा संकल्प करण्यात आला आहे. या तपाची धारणा दि. २८ जुलै रोजी गुरुदेवांच्या
सानिध्यात व मार्गदर्शनात संभाजीनगर येथे होत आहे. ज्यांना धारणासाठी संभाजीनगर येथे जाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी अ.नगरसह इतर ठिकाणी ऑनलाईन व्दारे धारणा संकल्प करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दि.२९ जुलैपासून या तपोत्सवाची सुरुवात होईल व दि ५ ऑगस्ट रोजी २१०० तपस्वींची तप पचकावणी होणार आहे. या तपोत्सवात भाग घेण्यास इच्छुक भाविकांनी नाव नोंदणीसाठी ९८९०८१६३२८/ ९७६२४०३८५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. या तप महोत्सवात शेकडो जैन,अजैन आनंद भक्त देशभरातुन सहभागी होतात. त्यांचा यथोचित सन्मान व व्यवस्था ही चातुर्मास समितीच्या वतीने करण्यात येते. तरी अ.नगर जिल्ह्यातील सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन आपली श्रद्धा भक्ती गुरु चरणी समर्पित करावी असे आवाहन आनंद तिर्थच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!