आष्टी (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे त्यानिमित्त देवळाली येथे शिबिराचे आयोजन करून महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले या योजनेचा गावातील व परिसरातील महिलांनी आपले फॉर्म भरून देऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवळालीच्या सरपंच अरुणाबाई पोपट शेकडे यांनी केले .
आष्टी तालुक्यातील देवळाली येथे दोन दिवसांचे शनिवार व रविवार दिनांक १४/ १५जुलै रोजी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये देवळाली लोखंडवाडी खरकटवाडी येथील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले फॉर्म भरून दिले जाणार आहेत या कामासाठी अंगणवाडी कार्यकर्ती अपर्णा विरंगळ पूनम कावळे मीरा तांदळे चमन शेख सुरेखा खेडकर रूपाली खंडागळे मदतनीस आशा शिरसाट ऐश्वर्या शिरसाट यांनी मार्गदर्शन करून आलेल्या महिलांचे फॉर्म ऑनलाईन करून घेण्याचे काम केले. यावेळी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी गावातील महिलांना मार्गदर्शन केले अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस नी घरोघरी जाऊन महिलानां या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले या महिला मेळाव्याचे उद्घाटन देवळालीच्या सरपंच अरुणाबाई पोपट शेकडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या दोन दिवशीय शिबिरामध्ये महिलांनी सहभागी होऊन चैतन्य स्वामी मंदीरासमोर सकाळी ९ते ४ या वेळेत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येऊन आपला फॉर्म ऑनलाइन करून घेण्याचे आवाहनही शेवटी सरपंच अरुणाबाई शेकडे यांनी उपस्थित महिलांना केले.