आष्टी (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्याची दुष्काळी ओळख पुसून टाकण्यासाठी शिंपोरा ते खुंटेफळ उपसा सिंचन योजना महत्वाची मानली जात आहे. या योजनेच्या कामासाठी आ. बाळासाहेब आजबे हे नियमित पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी सरकारने 150 कोटी रूपये मंजुर केले आहेत.
आष्टी तालुका हा नेहमीच दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे तालुक्यात शाश्वत सिंचनाची सोय व्हावी यासाठी शिंपोरा ते खुंटेफळ उपसा जलसिंचन योजना हि महत्वाकांक्षी योजना मानली जात आहे. या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावे यासाठी आ. बाळासाहेब आजबे हे नियमित पाठपुराव करत आहेत. सुरू असलेल्या अधिवेशनात या योजनेसाठी सरकारने 150 कोटी रूपये मंजुर केले आहेत. हि योजना पुर्ण झाल्यानंतर तालुक्याचा दुष्काळी असलेला कलंक पुसेल.
आष्टी तालुक्यासाठी महत्वकांक्षी असणारी आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी दोन दिवसापूर्वीच आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी विधानसभेत आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यामागनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी या योजनेसाठी निधीची तरतूद केल्याबद्दल आष्टी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात येते आहेत यापुढेही लवकरात लवकर काम व्हावे यासाठी लवकरच भरघोस निधीची तरतूद केली जाईल असे अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.या योजनेला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. बाळासाहेब आजबे यांनी राज्याचे मुख्यमंञी ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी ना. अजित पवार, उपमुख्यमंञी ना. देवेंद्र फडणवीस, बीडचे पालकमंञी ना. धनंजय मुंडे यांंचे आभार मानले आहेत.