अहमदनगर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र साहित्य परिषद,अहमदनगर शाखेच्या वतीने मा.आ.स्व. राजीव राजळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभ रविवार सात जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोहिनूर मंगल कार्यालय येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते होणार असुन सुनील गोसावी यांच्या आठवणींचा डोह आत्मचरित्र पर लेखसंग्रहास सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखेच्या प्रमुख कार्यवाह सौ.सुनिताराजे पवार या राहणार असून यावेळी आ. मोनिकाताई राजळे, कविवर्य आ.लहू कानडे ,आ.संग्रामभैया जगताप, आ सत्यजित तांबे, साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर,परीक्षण विभागाच्या सेक्रेटरी अंजली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी साहित्यिक प्राचार्य खातेराव शितोळे, प्रा मेधाताई काळे, कविवर्य चंद्रकांत पालवे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
इतर पुरस्कार पुढील प्रमाणे कादंबरी विभाग- बाळासाहेब लबडे, गुहागर, विलास शेळके, नाशिक, अशोक लिंबेकर,संगमनेर, अशोक निंबाळकर,नगर,भूपाली नीसळ नगर
कथासंग्रह विभाग – भास्कर बंगाळे, सोलापूर, लक्ष्मण दिवटे आष्टी, मनोहर इनामदार जामखेड, कविता संग्रह -माधुरी मरकड, पुणे, गीतेश शिंदे ठाणे, मंदाकिनी पाटील बदलापूर, आत्मचरित्र विभाग- पोपटराव काळे पुणे, सुनील गोसावी नगर, विशेष चरित्र -अविनाश घुले नगर संकीर्ण विभाग- विनोद शिंदे नगर आशिष नीनगुरकर,मुंबई ,विभाग -बाळासाहेब धोंगडे पुणे, आदींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सर्व साहित्यिक वाचक साहित्यप्रेमी मंडळी यांनी उपस्थित राहाव, असं अवाहन कार्यकारी मंडळाने केले आहे.
सुनील गोसावी यांच्या आठवणींच्या डोह मध्ये सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था, संघटनाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.