spot_img
spot_img

पशुसंवर्धन खात्यातील डॉ.सुनिल गदादे व डॉ.विष्णू साबळे यांना पदोन्नती

आष्टी(प्रतिनिधी)पशुसंवर्धन खात्यामध्ये कार्यरत असणारे तालुक्यातील भाळवणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेले डॉ.सुनिल गदादे व धामणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेले डॉ.विष्णू साबळे यांना सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावर गुरूवार दि २७ जून२०२४ रोजी शासनाच्या जेष्ठ ते यादी प्रमाणे पदोन्नती मिळाली असून अनुक्रमे पशुवैद्यकीय दवाखाना धानोरा आणि पशुवैद्यकीय दवाखाना धामणगाव या ठिकाणी पदस्थापना मिळाली आहे.
दोघेही पशुसंवर्धन खात्यामध्ये वीस वर्षापासून कार्यरत असून ते चांगली सेवा देत आहेत. विविध योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना लाभ मिळवून देण्याचे काम तसेच लंपी सारख्या साथ रोगामध्ये चांगल्या पद्धतीचे काम त्यांनी केलेले होते. त्यांच्या या पदोन्नतीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!