आष्टी(प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील रुई नालकोलचे भूमीपुत्र तथा पनवेल येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अजय कापरे हे गेल्या १२ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक व विद्यार्थी, युवक, शेतकरी, गोरगरीब सर्वसामान्यांच्या, विविध घटकांतील प्रश्न वेळोवेळी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने त्यांना सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने रविवार दि २३ जून रोजी आयोजित शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान गौरव समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश जाधव व सचिव सुरज भोईर यांनी दिली.
अजय कापरे यांनी २०१५ मध्ये पनवेल येथील स्व .राहुल पाटील, आर आर फाऊंडेशन ,आष्टी तालुका युवा पत्रकार संघ अध्यक्ष अविनाश कदम व सर्व पत्रकार यांच्या मदतीने आष्टी तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे खते , गरजवंताला अन्न धान्य किराणा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली .कोरोना काळात हि अनेक वेळा मदत केली आज ही पनवेल मधील बेघर मुलांना अन्नदान करत असतात त्यांच्या या कार्याची दखल मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येत असतात. या वर्षीचा २०२४ चा उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार अजय कापरे यांना जाहिर झाला असून उद्या रविवारी मुंबई पत्रकार संघ येथील पत्रकार भवन आझाद मैदानाजवळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्य,कला,क्रीडा,पञकारित, कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यावर्षी सामाजिक कार्यकर्ते अजय कापरे यांना समाज सेवा राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.