पाथर्डी प्रतिनिधी :- अ. ए. सो. चे भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाचा उद्देश आध्यात्मिक व शारीरिक साधनेच्या फायद्या बद्दल जागरूकता पसरविणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जिवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य श्री. कासार आर. व्ही. यांनी केले.
शालेय उपक्रमाचा भाग म्हणून सायंक्रीडा मंडळ चालविण्यात येते. योग दिनाच्या निमित्ताने या शैक्षणिक वर्षात शक्तीची देवता हनुमंतला नारळ वाढवून तसेच मैदानाची पुजा करून सायंक्रीडा मंडळाची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून शाळा सुटल्यावर रोज एक तास पारंपरिक खेळ खो-खो, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल, क्रिकेट तसेच बुद्धिबळ या सारख्या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. या वेळी क्रीडाशिक्षक श्री. यु. पी. शिंदे, श्री. प्रवीण शिंदे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका गायकवाड एम. पी. तसेच खेळाडू विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून दाखविले व सर्व विद्यार्थ्यांनी योगासने, सूर्यनमस्कार करून योग दिनाचा आनंद लुटला.