आष्टी(प्रतिनिधी)ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मागील नऊ दिवसांपासून वडीगोद्री येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे याच्या समर्थनार्थ हातोला, खिळद पाठोपाठ देवळाली येथेही ओबीसी बांधवांनी शुक्रवारी सायंकाळी अमरण उपोषण सुरू केले आहे.
जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे हे नऊ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. राज्य सरकार कसलीही दखल घेत नसल्याने ओबीसी बांधव आक्रमक झाला असून याची धग आष्टी तालुक्यात पोहचली असुन तालुक्यातील हातोला, खिळद पाठोपाठ शुक्रवारी सायंकाळी देवळाली गावातील समाज बांधवांनी दिलीप तांदळे,सुभाष तांदळे,याच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू केले आहे.