spot_img
spot_img

ताराबाई मनोहर कौसे यांचे दुःखद निधन

अहमदनगर (प्रतिनिधी) :- ताराबाई मनोहर कौसे यांचे सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी दुःखद निधन झाले असून त्या ८५ वर्षांच्या होत्या. मोहोज देवढे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ कौसे व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक जगन्नाथ कौसे यांच्या त्या आई होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे याच्या त्या आजी होत्या.

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ वा. मोहोज देवढे ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे. यावेळी ह.भ.प. राऊत दादा महाराज यांचे प्रवचन होणार आहेत.

त्यांच्या पश्चात ६ मुली, २ मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. ताराबाई मनोहर कौसे या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!