धामणगांव (प्रतिनिधी):- महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा धामणगांव तालुका आष्टी जिल्हा बीड या शाखेच्या वतीने दि.१७ जून २०२४ रोजी सकाळी ९:३०वाजता दिपककुमार शिंगवी यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर महाराष्ट्र ग्रामीण बँक धामणगांव अंतर्गत सर्व शेतकरी बाधवांसाठी महाग्रामीण नवचेतना संवाद शिबीर अंतर्गत शेतकरी व खातेधारकांसाठी मेळावा आयोजित केला होता. यावेळी बँकेचे कर्मचारी संजय कांबळे, मनोज शिंगवी,पंढरीनाथ राऊत, हनुमंत चौधरी, अंकुश लोखंडे, केशव गाढवे आदी उपस्थित होते