आष्टी (प्रतिनिधी ):- शेतीला जोडधंदा म्हणुन शेतकरी मोठ्या प्रमाणात दुध व्यावसाय करतो. ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक कणा सांभाळणारा दुध व्यावसाय सद्या मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. एकिकडे दुध खरेदी करणाऱ्या कंपन्या दुधाच्या खरेदी दरात कपात करत आहे, तर दुसरीकडे माञ विक्री दरात वाढ होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असतांना सरकार माञ याकडे दुर्लक्ष करून दुध व्यावसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा अंत पाहत असल्याच्या तीव्र भावना शेतकरी व्यक्त करत आहे.
दुष्काळी परिस्थिती असतांना दुध व्यावसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी दुध व्यावसाय टिकून ठेवला. लोकसभा निवडणुकीत व्यस्त असलेल्या सरकारने दुष्काळी परिस्थिती देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. चारा टंचाई असुन देखील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी तोट्यात असतांना देखील दुध व्यावसाय टिकून ठेवला आहे. माञ गेल्या आठ दहा दिवसात दुध खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी तब्बल दोन रूपयांनी दुधाचे दर कपात केले आहेत. तर दुसरीकडे काही खाजगी दुध कंपन्यांनी दुधाच्या विक्री दरात वाढ केलेली आहे. कंपन्या नफा कमवत आहेत तर शेतकरी दुध व्यावसाय तोट्यात करत आहेत. याला सरकार जबाबदार असल्याने दुध उत्पादक शेतकरी सरकार विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
➡️ मॅनेज होणाऱ्या संघटना
दुधाचे दर ऐवढे कमी झालेले आहेत की, सद्या मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. दुध व्यावसायला वाईट दिवस असतांना देखील एकही शेतकरी संघटना या विषयी आवाज उठवत नसल्याने या संघटना दुध व्यावसायिक लाॅबी बरोबर मॅनेज होतात. असा संशय सामान्य दुध उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
➡️ दुध व्यावसात राजकारण्यांचे असलेले वर्चस्व
राज्यात दुध खरेदी करणाऱ्या मोठ मोठ्या कंपन्या, सहकारी संघ आणि खाजगी संघ यावर सत्तेत असलेले आणि विरोधक असलेले राजकारणी यांचे वर्चस्व असल्याने सरकार आणि विरोध यापैकी कोणीच दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजुने आवाज उठवत नाहीत. त्यामुळेच दुध उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.
➡️ वाढलेले पशुखाद्याचे दर
दुध खरेदी दरामध्ये कपात होत असली तरी पशुखाद्यांचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुध उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ घालणे शक्य होईना. वाढलेला उत्पादन खर्च यामुळे दुध व्यावसाय तोट्यात चालला आहे.