spot_img
spot_img

पाथर्डी जि.प.प्राथमिक तालुका शाळेत नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत..

पाथर्डी (प्रतिनिधी) :- मातृभाषेतून घेतलेले दर्जेदार प्राथमिक शिक्षण व बालपणीचे संस्कार हे विद्यार्थ्यांच्या भावी जडणघडणीत महत्वाचे ठरतात. विद्यार्थ्यांचा मूळ पाया प्राथमिक व बाल विभागात भक्कम झाला तर पुढे उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी आपले इच्छित ध्येय सहज गाठू शकतात. प्राथमिक शिक्षणाने मुलांचे जीवन समृद्ध बनते. त्यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम महत्वाचे ठरतात. आजचा बालक हा उद्याच्या उज्ज्वल व प्रगतीशील देशाचा जबाबदार नागरिक असणार आहे. यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पाथर्डी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार व अधिकारी रामनाथ कराड यांनी केले

शहरातील तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नुतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापिका रत्नप्रभा महांडुळे, नंदा तुपे, शिक्षिका सीमा निकाळजे, अनुराधा निऱ्हाळी, लता कोकाटे, अर्चना खाडे, शोभा फुंदे, वैशाली जायभाय, सुरेखा बडे, ज्योती जाधव, भावना देवरे, मनीषा फटांगरे, मीना ठोंगीरे, शिला नागरे आदींसह शिक्षक पालक उपस्थित होते.
आज मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढत चालला असून इतर भाषेचे ज्ञान आवश्यक आहे परंतु केवळ दिखाऊपणा कडे न पाहता शिक्षणाचा दर्जा महत्वाचा असल्याचे भवार यांनी नमुद केले.

यावेळी नुतन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन औक्षण करत लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता व संपूर्ण शाळा सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट व खाऊचे ही वाटप करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आली. यावेळी रामनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा मुख्य कार्यक्रम नाथनगर मधील जिल्हा परिषद शाळेत पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नप्रभा महांडुळे, स्वागत नंदा तुपे यांनी केले तर आभार सुरेखा बडे यांनी मानले.
➡️ – इंग्लिश मीडियम शाळा ऐवजी आता मातृभाषेतील शिक्षणाकडे पालकांचा ओढा वाढला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद शाळेतही दर्जेदार शिक्षण मिळत आहे. शासनाच्या सर्व योजना शालेय पोषण आहार, गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान गणित प्रदर्शन, सेमी इंग्रजी हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक शाळेत राबवले जात असल्याने व शिक्षक ही विद्यार्थ्यांसाठी विशेष कष्ट घेत असल्याने जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा कल वाढला आहे. – सौ सुशिला खाटेर
विद्यार्थी पालक
➡️- शाळेत एक सेल्फी पॉईंटही करण्यात आला होता प्रवेशानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी उभे राहून अभिमानाने मोबाईल मध्ये सेल्फी फोटो काढले. ते दिवसभर पालकांच्या मोबाईल स्टेटसवर झळकत होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!