आष्टी (प्रतिनिधी)- कडा-देवळाली रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असले तरी याच रस्त्यावर असलेली कांबळे वस्तीवरील रस्ता काम अर्धवट सोडल्याने चिखलाचा सामना करावा लागत आहे.गुत्तेदारांचा निष्काळजीपणाने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.या कामाची चौकशी करून गुत्तेदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
आष्टी तालुक्यातील कडा ते शिवाचा मळा देवळाली हा १७ किलोमीटर अंतराच्या रस्ता कामासाठी १७ कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला होता.हे काम करताना सिंमेट रस्ताकाम करण्याचे कारण पुढे करत बेस्ट कंस्ट्रक्शनच्या मालकाने पुर्ण रस्ताकाम केले.पण आज करू उद्या करू असे वारंवार कारणं देत कांबळे वस्तीवरील रस्ताकाम तसेच ठेवल्याने ऐन पावसाळ्यात आता नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून देखील सांगतो ,बोलतो,बघू हेच कारण दिल्याने गुत्तेदारांला पाठीशी घालून हे काम तसेच अर्धवट सोडले आहे.संबंधित गुत्तेदारांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात रस्ताकाम कसे होणार!
उन्हाळा लागल्यापासून या रस्याचे काम सुरू होते.सार्वजनिक बांधकाम विभाग, गुत्तेदार यांना वारंवार बोलून देखील काम करण्याकडे दुर्लक्ष केले गेले.आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने हा रखडलेला रस्ता कसा होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.