spot_img
spot_img

तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक व वायरमन यांनी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत आढावा बैठकीत आ.बाळासाहेब आजबे यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना

आष्टी (प्रतिनिधी)सर्वसामान्य जनतेची काम हे मोठमोठे अधिकारी यांच्याकडे नसून ती तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक वायरमन आरोग्य सेवक यासारख्या कर्मचाऱ्यांकडे असतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन गावागावात पारावर बसून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत कोणालाही वेठीस धरू नये ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या अडचणी आम्हाला तात्काळ कळवाव्यात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

आष्टी तहसील कार्यालयांमध्ये खरीप हंगाम 2024 व इतर बाबींचा आढावा बैठक आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे तहसीलदार गायकवाड नायब तहसीलदार बाळदत्त मोरे, ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे ,बाळासाहेब पिसाळ सावता ससाणे,यांची प्रमुख उपस्थिती होती ,यावेळी पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात एमआइजिअसची कामे सुरू आहेत कुठलेही काम बंद राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम संबंधित कर्मचारी वर्गाचे आहे गावागावात या वेगवेगळ्या योजना विषयी माहिती देणे गरजेचे आहे एमआरएस च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचा फायदा घ्यावा व फळबाग लागवड क्षेत्र कसे वाढेल याकडेही कृषी अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणावर कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, गाय गोठा ही योजना एमआरइजीएस मधून चालू करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या जनावरांचे टॅगिंग पूर्ण करून घ्याव्यात व संभाव्य लशीबाबतचे लसीकरण करून जनावरे चे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जनजागृती करावी ,जलसंधारन कामा बाबत बोलताना आमदार आजबे म्हणाले की 1.68 टीएमसी चे शिंपोरा येथून पाईपलाईनचे काम 18 किलोमीटर पूर्ण झाले आहे एक पंप हाऊस चे काम पूर्ण झाले असून एक वर्षाच्या आत काम या योजनेचे काम पूर्ण होणार आहे त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांनी या योजनेतील कडे संपूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे खुंटेफळ साठवण तलाव क्षेत्रातील ज्या मागील शेतकऱ्यांना ज्या दराने मोबदला मिळाला आहे त्याचप्रमाणे मोबदला सर्व शेतकऱ्यांना आता ही मिळाला पाहिजे यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करत आहोत याबाबत कोणी तुझा भाव करत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही आमदार बाळासाहेब आजबे यांनी या बैठकीत दिले, उपजिल्हा रुग्णालयाची जागा विषय मार्गी लागला असून लवकरच 115 कोटी रुपये किमतीच्या उपजिल्हा रुग्णालयाची इमारतीचे काम सुरू होणार आहे ,2024 खरीप हंगामाच्या बाबतीत कृषी विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य बियाणे व खते कसे वापरावीत या संबंधित गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना कोणतेही बियाणे व खते कमी पडणार नाही यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत यापुढे खतांचा रॅक कायमस्वरूपी अहमदनगर येथे राहणार असल्यामुळे खते कमी पडणार नाहीत कृषी विभागांतर्गत 1069 शेतकऱ्यांना साडेचार कोटीचा लाभ विविध योजनेतून झाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले यावेळी तहसील ,पंचायत समिती ,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कृषी, विभाग वन विभाग ,पोलीस स्टेशन, गटशिक्षणाधिकारी ,बाल विकास अधिकारी, बँक ,जलसंधारण ,लघुपाटबंधारे या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देत कामकाजाबाबत आढावा सांगितला सर्व अधिकाऱ्यांना आमदार बाळासाहेब आजबे यांनी सर्वसामान्य जनतेचे काम कोणीही आडवु नका काम आडवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असे कोणीही वागू नये सामान्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठीच आपली नेमणूक केली आहे आपले काम प्रामाणिकपणे करावे अशा सूचनाही यावी शेवटी आ, बाळासाहेब आजबे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!