नगर(प्रतिनिधी)लोहार यूथ फाऊंडेशनतर्फे (एलवायएफ) लोहार समाजातील दहावी बारावी तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व वधू वर नोंदणी रविवारी (१६ जून) सकाळी १०वाजता नगर शहरातील स्टेशन रोडवरील सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात (हॉटेल फरहत समोर)आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. समाजातील वधू-वरांची नोंदणीही करण्यात येणार आहे. या गुणगौरव सोहळ्याला जिल्ह्यातील लोहार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच इच्छुक वधू वरांनी उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोहार यूथ फाऊंडेशनचे हर्षल आगळे व संघटन प्रमुख दत्तात्रय पोपळघट (९८८१३८४६३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहार यूथ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.