गरमागरम वडापाव म्हणजे मुंबईकरांचं जीव की प्राण. एक वडा पाव खाल्ल्याने पोट गच्च भरते. फक्त मुंबईतच नाही तर, जगभरात वडापाव खाणाऱ्यांची क्रेज पाहायला मिळते. वडा पाव फक्त भूक भागवण्यापुरता मर्यादित राहिला नसून, खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवणारा किंग मेकर ठरला आहे.
दर पाच मैलावर भाषा बदलते. त्याचप्रमाणे वडा पाव करण्याची पद्धत आणि चव देखील बदलते. काही वडा पाव आपल्या बटाट्याच्या सारणामुळे फेमस आहे तर, काही वडा पाव त्याच्यासोबत मिळणाऱ्या ओल्या – सुक्या चटणीसाठी चर्चित आहे. जागतिक वडा पाव दिनानिमित्त आपण वडा पावचे ८ प्रकार पाहूयात. नेहमीचा क्लासिक वडा पाव करण्यापेक्षा त्याला जरा हटके ट्विस्ट देऊन पाहा(Yummy Vada Pav Variants From Mumbai We Are Craving For).
दादरमधील अशोक वैद्य या मराठमोळ्या व्यक्तीने वडा पावचा शोध लावला. ओरीजनल वडापावची चव खरंतर विसरणं कठीणच आहे. कितीही वडा पावला फॅन्सी रूप देण्याचा प्रयत्न केला तरी, लोकांची पसंती क्लासिक वडा पाव खाण्यासाठी वळते. गरमागरम बटाटा भाजीचं सारण, त्यावर बेसनाचं जाडसर लेअर, सोबत पाव आणि चटणी. साधारण १५ रुपयात पोट भरून जाते.
सध्याच्या पिढीला चीज खाण्याचं वेड आहे. बर्गरमध्ये ज्याप्रमाणे चीजचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वडा पावमध्ये देखील चीजचा वापर केला जातो. मुंबईत चीज बर्स्ट वडा पाव फार फेमस आहे. आपण आजच्या दिनी चीज बर्स्ट वडा पाव नक्की ट्राय करून पाहू शकता.