spot_img
spot_img

शिवजयंती निमित्त शिवरायांचा मावळा समीर शेख यांनी घरावर लावली भगवी पताका.. शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात

आष्टी (प्रतिनिधी) – सर्वधर्म समभावचा दिला संदेश, आष्टी तालुक्यातील मावळा समीर बादशहा शेख आणि शेख कुटुंब यांनी शिवजयंती निमित्त त्यांच्या घरावर भगवी पताका लावून सर्व जनतेला आव्हान केले की, आपण दरवर्षी दिवाळी आणी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतोत आणि नवीन कपडे खरेदी करतो, त्याच प्रमाणे दरवर्षी शिवजयंती निमित्त सर्वांनी आपल्या घरावर भगवी पताका लावून घरासमोर रांगोळी काढून घरी गोड जेवण करायचे आहे, शिवजयंती हा मोठा सण साजरा करायचा आहे, शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात साजरी करायची आहे, समीर शेख हा वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून शिवरायांचे विचार गेल्या ११ वर्षापासून लोकापर्यंत पोहोचवत आहे.
शिवनेरी ते सांगवी पाटण पायी ज्योत आणणे , भैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त वाराणसी (काशी) येथून सात वर्षापासून गंगाजल आणत आहे, अपघातग्रस्तांना मदत करणे, आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्त पंढरपूर येथे जात असताना त्यांच्यासोबत फुगडीचा आनंद घेणे पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दिला.
सर्वधर्मसमभाव चा संदेश देत आहे, सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारे शेख कुटुंब गेले अकरा वर्षापासून घरी शिवजयंती साजरी करत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!