आष्टी (प्रतिनिधी):-आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा जि.प.प्रा.शाळेत लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज वायभासे यांनी ढोल, ताशा, हलगी, लेझीम संच भेट दिला.
या कार्यक्रमास मोहनराव आमटे (सरपंच), हिम्मत आमटे (उपसरपंच), अशोक वायभासे (माजी सरपंच), चांगदेव शेळके (माजी सरपंच), रावसाहेब सिरसाट, संदिप शिंदे, शरद गडकर सर, बाळासाहेब वायभासे, विठ्ठल आमटे, बाप्पू वायभासे, सुदाम घुले, नारायण वायभासे, विष्णु वायभासे, हनु आमटे, योगेश शेळके यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. कुटे सर, झिंजुर्के सर, गव्हाणे सर, तांदळे सर, कापसे सर, रजपुत सर, कचरे सर, सौ. शिंदे मॅडम आदी शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.