आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देवळाली येथिल श्री.भगवान(मिस्त्री)किसनराव जवणे यांच्या पत्नी सौ.गयाबाई भगवान जवणे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी शुक्रवार दि.१६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा स्वभाव मनमिळावु तसेच लोकांच्या सुखदुःखात त्या सतत पुढे असायच्या,त्यांच्या जाण्यानी देवळाली व परिसरातील लोकांनी खुप हळहळ व्यक्त केली त्यांच्या पश्चात पती,तीन मुली,एक मुलगा,सुन,नात,नातु,असा मोठा परिवार आहे.दशक्रिया विधी रविवार दि.२५ देवळाली ता.आष्टी जि.बीड येथे होणार आहे.