आष्टी (प्रतिनिधी):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. १० तारखेला सुरु झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील देवळाली येथे आज कडकडीत बंद पुकारण्यात आला.
अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी होत आहे. परंतू शासन त्यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाज हा मागास व आर्थिक दुबल असल्याने मराठा समाजासाठी तरुण, तरुणी यांना शैक्षणिक, नोकरीसाठी आरक्षण नसल्यामुळे चांगले शिक्षण घेणे दुरापास्त झालेले आहे. तसेच नोेकरी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत मागणी होत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
देवळाली कडकडीत बंद ➡️ मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व्यापार्यांनी आपली दुकाने स्वयस्फुतीने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. आरोग्य सेवा मात्र सुरळीत सुरु होती.