spot_img
spot_img

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे चिंचोली येथे रासेयोचे विशेष शिबिर

आष्टी (प्रतिनिधी)- शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे चिंचोली ता आष्टी येथे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी प्राचार्य भगवानराव वाघूले, उपप्राचार्य डॉ कैलास वायभासे, परमेश्वर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ भगवानराव वाघुले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संत गाडगे बाबा दिवसा ग्रामस्वच्छता व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून स्वच्छता बरोबरच समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज असून तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचोली येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ कैलास वायभासे, सरपंच हनुमंत अडागळे, चांगदेव एकशिंगे होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात उपप्राचार्य डॉ कैलास वायभासे म्हणाले की, विद्यार्थांसाठी राष्ट्रीय सेवा योजना फार महत्वाची असून राष्ट्रीय सेवा योजना मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जिद्द, स्पर्धा, चिकाटी निर्माण होत असते त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. ग्रामीण भागातील समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. यावेळी भाऊसाहेब लांडगे, कार्यक्रमाधिकारी प्रा बाळासाहेब बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी विश्वनाथ खेंग्रे, तलाठी योगेश गोरे, अंकुश एकशिंगे, बाबासाहेब एकशिंगे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ उस्मान पठाण यांनी तर उपस्थितांचे आभार सहकार्यक्रमाधिकारी अंजना गिरी यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!