आष्टी (प्रतिनिधी)एलआयसीच्या जागतिक विमा परिषदे साठी आष्टी येथील श्री शेख अतीक सर यांची निवड झाली आहे . अमेरिका येथे होत असलेल्या जागतिक विमा परिषद साठी त्यांची निवड झाल्याबद्दल पुणे येथील कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला .विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जागतिक बहुमान MDRT (अमेरिका ) 2024 या पुरस्काराने शेख अतीक सर यांना पुणे डिव्हिजनचे सीनियर डिव्हिजन मॅनेजर श्री मोघे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे . यावेळी LIC चे मार्केटिंग मॅनेजर सुदुंबेकर साहेब , जवळेकर साहेब , अहमदनगर शाखा प्रबंधक श्री कटके साहेब , जामखेड शाखेचे ब्रँच मॅनेजर गणेश औटी साहेब , विकास अधिकारी प्रसाद पोतदार साहेब आदी मान्यवर उपस्थित होते .
शेख अतीक सर हे गेल्या १८ वर्षांपासुन LIC ची सेवा देत आहेत . त्यांच्या उत्कृष्ट सेवे बद्दल LIC कंपनीने त्यांचा यथोचित सन्मान केल्याची भावना त्यांच्या ग्राहकामधून व्यक्त होत आहे . त्यांच्या या यशाबद्दल आमदार सुरेश आण्णा धस , आमदार बाळासाहेब आजबे , माजी आमदार भिमराव धोंडे तसेच आष्टी ‘कडा , जामखेड , धानोरा , धामणगाव , पिंपरखेड , सराटे वडगाव आदी ठिकाणातील राजकिय सामाजिक व्यापारी वर्ग तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी बोलताना अतिक सर म्हणाले की जागतीक क्रमवारीत LIC चा चौथा क्रमांक आहे तर भारतामध्ये LIC चा विमा क्षेत्रात प्रथम क्रमांक आहे . तसेच हा सन्मान त्यांनी त्यांच्या ग्राहकांना समर्पित करत असल्याचे सांगीतले .