spot_img
spot_img

शेवगाव भाजपचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा कोरेगाव येथे सत्कार

पाथर्डी (प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरडगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुषार वैद्य यांचा कोरडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने राजे छत्रपती विद्यालय येथे सत्कार करण्यात आला‌.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू म्हस्के, वंचित बहुजन आघाडी शेवगाव महिला तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, भाजप ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अशोक गोरे खेर्ड्याचे बाबासाहेब सांगळे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वाळके, संस्थापक शिवाजीराव बनसोडे, महात्मा फुले सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. धर्मराज सुरवसे, युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश म्हस्के, बालमटाकळी ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन काळे, किरण पाथरकर, बबन मुखेकर, नानासाहेब जाधव, जगन्नाथ गोरे यांच्यासह कोरडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या सत्काराला उत्तर देताना वैद्य म्हणाले की, मला पक्षाने तिसऱ्यांदा भाजप तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांचा सामाजिक, राजकीय वारसा आमच्या पाठीशी असून, जनतेने ही बालमटाकळी ग्रामपंचायत चे सरपंच म्हणून अनेक वर्षे सेवा करण्याची संधी दिली. माझ्यावर जनतेने आज पर्यंत भरभरून प्रेम केलेले आहे, स्व. गोपीनाथजी मुंडे व स्व. शिवनाथ अण्णा यांचे संस्कार लहानपणापासून माझ्यावर झालेले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पदावर असताना सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करत आहे. राजकारणात पैसा कमावणे हा उद्देश नसून सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहे, सत्कारातून माझी आणखी जबाबदारी वाढलेली आहे असे मत तुषार वैद्य यांनी व्यक्त केले. यावेळी रविंद्र उर्फ भोरू म्हस्के यांच्यासह उपस्थित सर्वांनीच तुषार वैद्य यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!