बोधेगाव (प्रतिनिधी)दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील आय.सी.ई. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( कात्रज ) या ठिकाणी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला तसेच तृतीय वर्षाच्या झालेल्या शालांत परीक्षामध्ये शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सर्वसामान्य कुटुंबातील प्रथमेश बिरजू परदेशी या विद्यार्थ्याने ७४.६० टक्के गुण मिळवून घवघवीत असे यश प्राप्त केले असून या यशाबद्दल प्रथमेश बिरजू परदेशी यांचे संघाचे जिल्हा कार्यवाहक सुरेश काजवे, ह.भ.प. शितलताई महाराज देशमुख, राहुल महाराज देशमुख, माजी सरपंच अशोक खिळे, राम भिसे, अनिल परदेशी, वडील बिरजू परदेशी, सामाजिक कार्यकर्ते योगेश परदेशी, हरूनभाई शेख, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश बागडे, पत्रकार इसाक शेख, अशोक गुंजाळ देविदास शिंदे, आबातात्या घोरपडे, सोमनाथ वैद्य, डॉ. अविनाश पुंडे यांच्यासह बोधेगाव परिसर प्रेस क्लब सह आदींनी प्रथमेश परदेशी यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.