spot_img
spot_img

डॉ. महादेव महाडिक यांची न्यूयॉर्क अमेरिका येथे शास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्रोफेसर पदी निवड भारत- साऊथ कोरिया ते न्यूयॉर्क प्रवास.. उच्च शिक्षण घेवून नोकरी नाही असं म्हणणाऱ्या तरुणांना एक प्रेरणा

पाथर्डी (प्रतिनिधी) :- उच्च शिक्षण आणि संशोधन यामध्ये ग्रामीण भागातून येणारी विद्यार्थी अग्रेसर ठरत आहेत. पाथर्डी तालुक्यातील शिरापुर येथील डॉ. महादेव आबासाहेब महाडिक हे काय त्याला अपवाद नाहीत, महाडिक यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थिती मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिरापूर, नंतर माध्यमिक शिक्षण वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव, श्री आनंद कॉलेज पाथर्डी मधून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी व नंतर पुणे विद्यापीठ येथून पदवीत्तर शिक्षण घेत असताना त्यांना संशोधनाची कास असल्यानं ते लगेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदवीत्तर शिक्षणानंतर पी.एच.डी करीता रुजू झाले.त्यांना प्रोफेसर सी. एच. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या सौर प्रकाश वापरून हायड्रोजन उत्पादन ऊर्जा व कार्बन डायऑक्साइड ची कपात अशा विविध प्रकारचे संशोधनावर साऊथ कोरियन युनि्हर्सिटी ने त्यांची पोस्ट डॉक्टरेट करीता निवड केली, त्यांना त्या दरम्यान 3 ते 4 वेळा नामांकित अशा अतिउत्कृष्ट पुरस्कार असलेल्या Marie -Curie शिष्यवृत्ती ने पुरस्कृत केले गेले, त्यांनी आज पर्यंत 117 शोधनिबंध सादर केले असून त्यांनी विविध ठिकाणी शास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्रोफेसर पदी, म्हणून काम केले, त्यांच्या या सर्व कामाची Cornell University Ithaca, न्यूयॉर्क अमेरिका यांनी दखल घेत त्यांची शास्त्रज्ञ आणि सहाय्यक प्रोफेसर पदी म्हणून निवड झाली आहे. त्याच बरोबर UK-Government ने त्यांना UK-Asia Young Reasearcher Award 2024 नेही सन्मानीत केले आहे. या झालेल्या निवडीने सर्वच क्षेत्रातून त्याचे कौतुक केले जात आहे, डॉ. महादेव यांनी स्वतःची ओळखच नाही तर आपल्या गावाचे नाव साऊथ कोरिया, न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी रोशन केले. त्यांच्या या मिळवलेल्या यशा पाठीमागे त्यांच्या सुविद्य पत्नी ,सर्व कुटूंबातील सदस्य, त्यांना मार्गदर्शक म्हणुन त्यांना लाभलेले सर्व शिक्षक वर्ग व त्यांचे मित्रपरिवार यांचे सहकार्य असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!